Posts

Showing posts from October, 2018

#मी टू..

Image
नाना,आलोकनाथ,विकास बहल, चेतन भगत....आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते सर्वच.... विश्वास ठेवायचा कुणावर हा प्रश्नच? शेतकरी विधवा स्त्रियांना मदत,प्रकाश आमटेंची भूमिका साकारणारे नाना की तनुश्री दत्ता ने आरोप केले ते नाना,हे खरे की ते?? दिव्याखाली अंधार हे जसं सत्य..तसंच बॉलिवूड च्या झगमगाटात पण काळं वास्तव आहे हे सत्यच.. मुद्दा फक्त बॉलीवूड पुरताच नाही.कॉर्पोरेट,मीडिया हाऊसेस,प्रशासन,राजकारण आणि बरीच क्षेत्र पकडला तो चोर हाच न्याय असेल तर अनेक चोर पकडलेच जात नाही त्यांचं काय?? नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय,स्त्री शक्तीची पूजा करण्याचा सण...?? की फक्त दिखावा च? 'स्त्री-सबलीकरण' हे नाव क्रांतिकारक वाटत असलं तरी, राजकीय लोकांनी त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी उभा केलेला एक भंपकपणाच...वास्तविकता फारच निराळी.. 'मी टू'च्या निमित्ताने स्त्रिया बोलताहेत त्यांना अनेक स्तरांतून पाठिंबा मिळतोय हे मात्र आश्वासक. तरी मूलभूत प्रश्न उरतातच,पुरुषप्रधान मानसिकता पूर्णच नाहीशी व्हायला अजून किती पिढ्या जायला लागणार कुणास ठाऊक? सुसंस्कृत,उच्चभ्रू म्हणवल्या जाणाऱ्या समाजात स्त्रियांच्या...

अनेक जणींतून तू एकच...

Image
फर्ग्युसन मध्ये माझा क्लास कोणता? हे तिथून बाहेर पडलो तरी कळलं नाही. शहरी की ग्रामीण,पाश्चिमात्य की देशी,कि दोन्हींच कॉकटेल? कुणीतरी इम्प्रेस होईन म्हणून महागडे शूज घातले पण कपडे तेच.. मी जसा नाहीच तसा दाखवण्यात अर्थ होता काय? शो ऑफ यालाच म्हणतात का? एकदा तू लायब्ररी त आली इंग्लिश मधून काहीतरी विचारलं.., मी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं,तुला माझा क्लास कळला मग तू तेच मराठीतून विचारलं.. तुझी गोरी कातडी अन साजेशी वेस्टर्न वेशभूषा,मी गडबडून हातवारे च उत्तर दिलं. मनात म्हणालो "आयला हि ला तर मराठी येतं?" शूज महागडे घातले तरी काही फरक पडत नाही.. हे खरंच..!! एकदा पत्या म्हणाला सिगारेट पिताना किलर लूक येतो,अन पोरी इम्प्रेस होतात...खरंच?? मी नाही ओढली, सिगारेट वर इम्प्रेस होते ती पोरगी काय कामाची? नशा विडी ने जास्त होते ऐकलंय,पण किंमत अन ग्लॅमर सिगारेट ने च का नेलं??.. तुझ्याशी बोलताना मी शहरी शुद्ध बोलन्याचा अभिनय का करायचो? अन पकडला जायचो... वडापाव सहज खाता येतो,तुझ्यासोबत बर्गर इतक्या सहजी नाही खाता आला... फर्ग्युसन च्या अँम्फी मध्ये डॉ.प्रकाश आमटे आले होते..ते महत्वा...