अनेक जणींतून तू एकच...

फर्ग्युसन मध्ये माझा क्लास कोणता? हे तिथून बाहेर पडलो तरी कळलं नाही.
शहरी की ग्रामीण,पाश्चिमात्य की देशी,कि दोन्हींच कॉकटेल?
कुणीतरी इम्प्रेस होईन म्हणून महागडे शूज घातले पण कपडे तेच..
मी जसा नाहीच तसा दाखवण्यात अर्थ होता काय? शो ऑफ यालाच म्हणतात का?
एकदा तू लायब्ररी त आली इंग्लिश मधून काहीतरी विचारलं..,
मी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं,तुला माझा क्लास कळला मग तू तेच मराठीतून विचारलं..
तुझी गोरी कातडी अन साजेशी वेस्टर्न वेशभूषा,मी गडबडून हातवारे च उत्तर दिलं.
मनात म्हणालो "आयला हि ला तर मराठी येतं?"
शूज महागडे घातले तरी काही फरक पडत नाही.. हे खरंच..!!

एकदा पत्या म्हणाला सिगारेट पिताना किलर लूक येतो,अन पोरी इम्प्रेस होतात...खरंच??
मी नाही ओढली, सिगारेट वर इम्प्रेस होते ती पोरगी काय कामाची?
नशा विडी ने जास्त होते ऐकलंय,पण किंमत अन ग्लॅमर सिगारेट ने च का नेलं??..
तुझ्याशी बोलताना मी शहरी शुद्ध बोलन्याचा अभिनय का करायचो? अन पकडला जायचो...
वडापाव सहज खाता येतो,तुझ्यासोबत बर्गर इतक्या सहजी नाही खाता आला...
फर्ग्युसन च्या अँम्फी मध्ये डॉ.प्रकाश आमटे आले होते..ते महत्वाचे नव्हते...
अमेरिकन विद्यापीठाचा प्रोफेसर आला तेव्हा तुला मोठं अप्रूप होतं त्याचं..
त्यावेळी तू म्हणाली थोडा ग्लोबल हो रे...तेव्हापासून लस्सी स्ट्रॉ ने प्यायला लागलो...
तू म्हणाली होतीस शहरात जगण्याचं काही कल्चर असतं... फॉलो करायला शिका..

तू पण एक
अकरावी बारावी तच खूप आवडली होती,मित्र म्हणायचे तूझ्याकडे पाहतेय.
आपण एकाच क्लास मध्ये असलो तरी,आपला 'क्लास' वेगळा होता.
माझा बहुतेक वेळा तुला पाहण्यात अन तुझा अभ्यास करण्यात जायचा
मला मार्क कमी पडले,मी तुझ्या क्लास चा नव्हतोच..,तू इग्नोर केलं ते बरं झालं.
तुझं अरेंज मॅरेज झालं तर छानच,लव्ह मॅरेज झालं तर मी च कमनशिबी..

शेवटी पंढरपुरात धोतरावाले आणि शिर्डीत हाफ चड्डीवाले च का?
तू एकच आहेस तर,आम्हाला दोन वेगळ्या क्लास मध्ये का भेटतो?
पैसेवाल्यांना वेगळ्या रांगेतून पटकन दर्शन का देतो,प्रसन्न ही होतो म्हणतात...
परवा दिल्लीत जवान आणि किसान भिडले...
त्यांना भिडायला लावणारे तुझ्याकडे पहिल्या रांगेत असतात दर्शनाला???

तू वास्तविकतेत आहेस...
पण माझ्यासाठी कल्पनाच होतीस...
हा 'क्लास' लिहिताना तुझ्या काल्पनिक प्रतिमेचा आधार घ्यावा लागला...
म्हणून तुझ्याच भाषेत SORRY....
                                  - Avinash

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

#मी टू..